jawan naxal 
देश

जवानाच्या सुटकेसाठी मागणी; व्हायरल फोटोसोबत नक्षलवाद्यांनी दिलंय निवेदन

सकाळ वृत्तसेवा

विजापूर - छत्तीसगडमधील बस्तर येथे ३ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीनंतर नक्षलवाद्यांच्या तावडीत सापडलेला कोबरा कमांडो राकेश्‍वरसिंह मन्हास याचा फोटो आज जारी करण्यात आला आहे. या संघर्षामध्ये २२ जवान हुतात्मा झाले होते. सध्या नक्षलवाद्यांकडून प्रसिद्ध झालेले हे छायाचित्र सोशल मीडियामध्ये व्हायरल होते आहे. दुसरीकडे राकेश्‍वरसिंह यांच्या सुटकेसाठी त्यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांनी आज जम्मू-पूँछ महामार्गावर आंदोलन करत वाहतूक रोखून धरली होती. राकेश यांची नक्षलवाद्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका होईल असे आश्‍वासन सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली.

जवानाच्या व्हायरल फोटोबाबत बोलताना बस्तर रेंजचे पोलिस महासंचालक पी. सुंदरराज म्हणाले की, ‘‘ आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. राकेश्‍वरसिंह यांची सुटका व्हावी म्हणून सर्वोतपरी प्रयत्न केले जातील.’’ नक्षलवाद्यांकडून मंगळवारी याबाबतचे एक निवेदन हिंदीतून प्रसिद्ध करण्यात आले असून त्यामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, ‘‘ ज्या ठिकाणावर चकमक झाली तेथून राकेश्‍वर यांना ताब्यात घेण्यात आले.’’ या जवानाची सुखरूप सुटका व्हावी म्हणून छत्तीसगड सरकारने मध्यस्थाची नेमणूक केली आहे. दरम्यान या जवानाला सोडण्याच्या बदल्यात नक्षलवाद्यांकडून नेमक्या कोणत्या मागण्या करण्यात आल्या आहेत हे मात्र सरकारकडून सांगण्यात आलेले नाही.

नक्षलवाद्यांचे निवेदन
दंडकारण्य विशेष क्षेत्रीय समितीचा प्रवक्ता विकल्प याच्याकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले असून यामध्ये राज्य सरकारने मध्यस्थांची नावे जाहीर केल्यानंतरच जवानाची सुटका करण्यात येईल, तोपर्यंत हा जवान आमच्याकडे सुरक्षित राहील असे म्हटले आहे. दरम्यान या जवानाच्या सुटकेच्या बदल्यात नक्षलवाद्यांकडून कोणत्याही नव्या मागण्या करण्यात आलेल्या नाहीत. सध्या पोलिस देखील या निवेदनाची सत्यता पडताळण्याचे काम करत आहेत.

कार्यकर्त्याचा पुढाकार
या अपह्रत जवानाच्या सुटकेसाठी सोनी सोरी या सामाजिक कार्यकर्त्याने पुढाकार घेतला असून तो याआधीच ज्या ठिकाणी चकमक झाली त्या घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाला आहे. पोलिस देखील स्थानिक लोक, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार यांच्याशी चर्चा करत मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT